ग्रामसचिवालय खेराडे वांगी
"आपली ग्रामपंचायत , समृध्द ग्रामपंचायत "
(स्थापना १९५६)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
एकूण लोकसंख्या
शिक्षित लोकसंख्या
अशिक्षित लोकसंख्या
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
मौजे खेराडे वांगी या गावची स्थापना १६३१ साली झाली. तरड नावाची भावकी गावामध्ये आली, त्यापूर्वी फिरता (वेळो वेळी स्थलांस्तरीत होणारा), धनगर व कासार समाज गावामध्ये होता. त्यानंतर तळेगाव व इंदापूर येथून आलेला मराठा समाज व बारा बलुतेदार गावात स्थायिक झाले. १८०० सालादरम्यान दोन नंबर ची भावकी आली. त्यानंतर गावातील कायमचे वास्तव्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज व जगत गुरु संत तुकाराम महाराज यांच्या संकल्पनेतून हे गाव वसले आहे. यादव कालीन इतिहासातील सिंगन खडी आई मंदिर आहे. खेराडे वांगी गावचे जुने नाव खोराटी होते व त्यानंतर बदल करून खेराडे वांगी करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये देहू नंतर जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा बिजोत्सव कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आताचे कालावधीमध्ये महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) याच गावामध्ये २०२० मध्ये स्थापन झाली आहे.

जिल्हा परिषद आदर्श शाळा ( मॉडेल स्कूल )
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
- पत्ता: मु.पो.खेराडे वाांगी ता. कडेगाव जि .सांगली , पिन नं- ४१५ ३११
- सरपंच मो नं: ९५०३२४२११८
- ग्रामपंचायत अधिकारी: ९८२३४६८५३६
- ईमेल: Gpkheradewangi2021@gmail.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!